चंद्रपूर : जनआक्रोश मेळाव्यात काँग्रेसमधल्या फुटीचा 'आक्रोश'

06 Nov 2017 09:54 PM

भाजपवर प्रहार करण्यासाठी काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन छेडलं आहे. मात्र विदर्भात जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसमधल्या फुटीचा आक्रोश पाहायला मिळाला. कारण चंद्रपुरात अशोक चव्हाण समर्थकांचा विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वाखाली, तर अशोक चव्हाणांवर नाराज मंडळींचा नरेश पुगलियांच्या नेतृत्त्वाखाली मेळावे पार पडले.

वडेट्टीवारांनी चांदा क्लब मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर याच मेळाव्यासमोरून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाची रॅली काढण्यात आली. विदर्भातील काँग्रेसमधल्या फुटीमुळं अनेक नेत्यांनी आजच्या जनआक्रोश मेळाव्याला पाठ दाखवली.

LATEST VIDEOS

LiveTV