चेन्नई : कमल हसनची सेकंड इनिंग, राजकीय पक्ष स्थापन करणार

06 Nov 2017 10:00 PM

चेन्नईच्या राजकारणात अभिनेता कमल हसनमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम.जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर आता कमल हसन राजकारणात प्रवेश करणार आहे. शिवाय लोकवर्गणीतून तो स्वतःचा पक्ष काढणार आहे.

चेन्नईतल्या एका कार्यक्रमात कमल हसननं यासंदर्भात घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी कमल हसनचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं तो एक मोबाइल अॅप लाँच करणार आहे. अॅपच्या माध्यमातून आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन तो चाहत्यांना करणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV