चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांची अखेर राजकारणात एन्ट्री

31 Dec 2017 11:09 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. चेन्नईत नव्या वर्षाच्या तोंडावर रजनीकांत यांनी आपण राजकारणाच्या मैदानात उतरत असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. याआधीच रजनीकांत यांनी राजकारणात एन्ट्रीचे सुतोवाच केले होते. अखेर आज त्यांनी याची अधिकृतपणे घोषणा केली.. मात्र पक्षाचं नाव काय असेल., हे मात्र आज जाहीर करण्यात आलेलं नाही. जयललिला यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी रजनीकांत यांच्या रुपानं भरुन निघेल का.. यावरुन आता तर्क-वितर्क मांडले जाऊ लागले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV