गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलमधल्या कर्मचाऱ्यांची चांदी, गलेलठ्ठ पगारासह सर्व सोयी-सुविधा

22 Nov 2017 11:30 AM

गुगल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जॉब मिळाला, की गलेलठ्ठ पगार मिळणं साहजिक आहे. पण पगारासोबतच या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात, तुम्हाला माहिती आहे.?

गुगलमधल्या कर्मचाऱ्यांना हेअरकट, आरामासाठी पॉवरनॅप मशीन आणि लाँड्रीच्या सुविधा मिळतात, तर मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ट्री हाऊसची सोय केली आहे. आणि आता अॅपलच्या सुविधा पाहा. अॅपलच्या कर्मचाऱ्यांना अॅपलच्या प्रोडक्ट्सवर तब्बल 25 ते 50 टक्क्यांची भरघोस सूट दिली जाते. दरम्यान या कंपन्यांबरोबरच आता फ्लिपकार्टनंही आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आणि आकर्षक सुविधा देऊन खूश ठेवायचा करतंय. फ्लिपकार्टतर्फे कर्मचाऱ्यांना २४ तासांसाठी टेलिफोनिक कौन्सिलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये कामाशिवाय कौटुंबिक अडचणी, इतर कायदेशीर बाबी आणि इतर कोणत्याही तक्रारींबाबत समुपदेशन करण्यात येते.

LATEST VIDEOS

LiveTV