पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो चौथ्यांदा झाला पिता

13 Nov 2017 10:15 PM

पोर्तुगाल आणि रिआल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्यांदा पिता झाला आहे. रोनाल्डोची मैत्रिण जॉर्जिना रॉड्रिगेझनं एका मुलीला जन्म दिला असून, अॅलना मार्टिना असं तिचं नामकरण करण्यात आलं आहे. रोनाल्डोनं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.रोनाल्डोनं जॉर्जिना रॉड्रिगेझ, थोरला लेक ख्रिस्तियानो ज्युनियर आणि नवजात कन्या अॅलना मार्टिना यांच्यासोबतचं आपलं छायाचित्रही पोस्ट केलं आहे. रोनाल्डोनं सरोगेट मदरच्या सहाय्यानं जून महिन्यात इव्हा आणि मॅटिओ या जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

LATEST VIDEOS

LiveTV