मुंबई : नाताळच्या मुहूर्तावर ‘मुंबई टू गोवा’ क्रूझ प्रवासाला सुरुवात

25 Nov 2017 01:03 PM

मुंबई ते गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रूझ प्रवासाला आता नाताळचा मुहूर्त मिळाला आहे. मुंबई-गोवा दरम्यानच्या कोकणातील 72 ठिकाणी या जेट्टी उभारण्यात येणार असून 25 डिसेंबरला हा जलप्रवास प्रवासी आणि पर्यटकांसाठी सुरु होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आता आंतरराष्ट्रीय क्रूझनं जलप्रवास करता येणार आहे.

कोकणातल्या 72 ठिकाणच्या जेट्टी निर्मितीनंतर 700 किमी समुद्राचं अंतर पार करुन गोव्यापर्यंत प्रवास करणं शक्य होणार आहे. यामुळे अनेक कोकणवासियांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV