मुंबई : मी कोण नाही, काँग्रेसच्या मोर्चात सर्वसामान्य मुंबईकरही पोलिसांनी गाडीत घातले

01 Nov 2017 01:24 PM

काँग्रेसने मुंबईत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. दादर भागात मनसे आणि काँग्रेस आमने सामने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या या कारवाईत सर्वसामान्य व्यक्तींनाही जबरदस्तीने ताब्यात घेत असल्याचं दिसून येत आहे. कारण दादरमध्ये जेव्हा एका व्यक्तीला पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत ढकललं तेव्हा ती व्यक्ती ओरडून सांगत होती की, ‘’मी मोर्चात नाही’’, तरीही पोलिसांनी त्या व्यक्तीला गाडीत ढकललं.

LATEST VIDEOS

LiveTV