मुंबई : फेरीवाला सन्मान मोर्चावेळी दादरमध्ये काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले!

01 Nov 2017 12:42 PM

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दादरमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु यावेळी मनसे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकून विरोध केला.

LiveTV