मुंबई : फेरीवाला सन्मान मोर्चाच्या आयोजकांची गाडी मनसेनं फोडली

01 Nov 2017 03:30 PM

मुंबईतील फेरीवाल्यांच्या समर्थनात काँग्रेसनं मोर्चा काढल्यानंतर मनसेनं हा मोर्चा उधळून लावला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे कार्यकर्ते दादरमध्ये जमा झाले आणि मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि त्यांनी हा मोर्चा उधळून लावलाय. य़ावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मोर्चाच्या दिशेनं लिंबू आणि बटाटे फेकले. ऐनवेळी झालेल्या या राड्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
आणि काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. तर संजय निरुपम यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV