मुंबई : साहीरच्या पुण्यतिथीनिमित्त खास कार्यक्रमांचं आयोजन

25 Oct 2017 11:48 AM

कवी, गीतकार आणि लेखक साहीर लुधियानवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. 1921 मध्ये पंजाबच्या लुधियानात त्यांचा जन्म झाला. मात्र फाळणीआधी ते लाहोरला स्थायिक झाले. उर्दू, हिंदी साहित्यात त्यांनी अल्पावधीत नाम कमावलं. फाळणीनंतर त्यानंतर साहीर यांनी थेट मुंबई गाठली आणि बॉलिवूडमधील आघाडीचे गीतकार म्हणून नाव कमावलं. साहीर आणि ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांच्यातील नाजूक आणि समर्पित प्रेमाची कहाणीही कायम चर्चेत राहिली. ज्या काळात गायकांचा दबदबा होता, त्या काळात गायकापेक्षा जास्त मानधन घेणारा गीतकार म्हणून त्यांचं नाव होतं. 25 ऑक्टोबर 1980 ला वयाच्या अवघ्या 59 व्या वर्षी त्यांचा ह्रदयविकारानं मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV