नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया

01 Dec 2017 10:39 AM

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. अध्यपदाच्या निवडीसाठी आज अधिसूचना जारी केली जाईल. तसंच इच्छूक आज आपला उमेदवारी अर्ज भरु शकतात.

उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 4 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तर 5 डिसेंबरला अर्जांची छाननी करुन दुपारी 3.30 वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी जाहीर करण्यात येईल.

मात्र पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV