नवी दिल्ली : जनलोकपालसाठी अण्णांचा एल्गार, 23 मार्चपासून आंदोलन छेडणार

29 Nov 2017 12:57 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनाचं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं आहे. 23 मार्च 2018 रोजी दिल्लीत अण्णा पुन्हा आंदोलन सुरु करणार आहेत.

23 मार्चला शहीद दिन असतो. त्यामुळे या तारखेची आंदोलनासाठी निवड केल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.

या संदर्भात अण्णांनी देशभरातील कार्यकर्त्यांशी अण्णांनी संवाद साधला. त्यानुसार फेब्रुवारी ऐवजी मार्चला प्राधान्य देण्यात आलं, तर आंदोलनाच्या जागेसंदर्भात सरकार बरोबर पत्र व्यवहार सुरु आहे.

रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा शहीद पार्कवर आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV