नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी, काँग्रेसकडून अधिकृतपणे घोषणा

11 Dec 2017 05:51 PM

अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली.

राहुल गांधी बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.

दरम्यान, राहुल गांधींच्या निवडीनंतर दिल्ली काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रंगांची उधळण करुन, आनंद व्यक्त केला.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं.

LATEST VIDEOS

LiveTV