नवी दिल्ली : एटीएम लुटण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकावर गोळीबार

16 Nov 2017 12:54 PM

दिल्लीजवळच्या माजरा डबास भागात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एटीएमच्या सुरक्षारकावर गोळीबार केला.  बुधवारी दुपारी ही घटना घडली. स्टेट बँकेचं एटीएम लुटण्याच्या उद्देशानं हे हल्लेखोर आले होते. यातल्या एका हल्लेखोरानं एटीएमच्या बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकावर गोळी झाडली. दलीप तिवारी असं जखमी सुरक्षारक्षकाचं नाव आहे.  तिवारींच्या हातात असलेली बंदुक हिसकावण्याचा हल्लेखोरानं प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापटी झाली. ही सगळी दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV