नवी दिल्ली : कलम-45 सुप्रीम कोर्टाकडून रद्द, छगन भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता

24 Nov 2017 12:33 PM

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे..कारण आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अर्थात मनी लाँड्रिंगमधलं कलम ४५ हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे...या कलमानुसार आरोपींना जामिन नाकारण्यात येत होता, मात्र हे कलम रद्द झाल्यानं या प्रकरणातल्या सर्व आरोपींना जामिन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे... छगन भुजबळ यांच्या जामिन अर्जावर आज पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे..यावेळी कोर्टाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेतली जाऊ शकते..

LATEST VIDEOS

LiveTV