नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली

14 Oct 2017 11:57 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली. गाझियाबादच्या मोहननगर परिसरात ही कार सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. 3 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सचिवालयातून ही कार चोरी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आज अखेर ही गाडी सापडल्याचं कळतंय. दिल्ली निवडणुकांदरम्यान अरविंद केजरीवाल याच गाडीमधून आपल्या निवडणुक प्रचारासाठी जात होते. शिवाय मुख्यमंत्री झाल्यापासून ते याच गाडीचा वापर करतात. त्यामुळं या गाडीची सोशल मीडियावर मोठी चर्चा होती. मात्र ही गाडी चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ माजली होती.

LATEST VIDEOS

LiveTV