नवी दिल्ली : राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरुन पूनावाला भावंडांमध्ये वाद

30 Nov 2017 12:57 PM

राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरुन पूनावाला भावंडांचं नातं अडचणीत आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शहजाद पूनावालांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. ते इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड अध्यक्ष होणार आहेत. अध्यक्षपदाची मॅच आधीच फिक्स आहे, असा आरोप शहजाद यांनी केला. शिवाय पक्षात घराणेशाहीनं मूळ धरल्याचंही त्यांनी म्हटलं.
यानंतर तहसीन पूनावाला यांनी शहजाद यांच्यावर तोफ डागली. राहुल यांच्यावर केलेली टीका अत्यंत खेदजनक प्रकार आहे, त्यामुळे आपण खूप व्यथित झाल्याचं तहसीन यांनी म्हटलं.

LATEST VIDEOS

LiveTV