नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

11 Dec 2017 08:36 PM

अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली.

राहुल गांधी बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.

दरम्यान, राहुल गांधींच्या निवडीनंतर दिल्ली काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रंगांची उधळण करुन, आनंद व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV