नवी दिल्ली : राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

13 Dec 2017 11:06 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीवरुन निवडणूक आयोगानं कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधी यांची मुलाखत दाखवण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखती हा आचारसंहितेचा भंग असून ही मुलाखत दाखवणाऱ्या वाहिन्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींना 18 डिसेंबरच्या पाच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर देताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी दिलेल्या मुलाखतीची आठवण करुन दिली. ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला.

LATEST VIDEOS

LiveTV