नवी दिल्ली: वाढत्या प्रदुषणामुळे शाळांना सुट्टी

08 Nov 2017 11:21 AM

नवी दिल्लीतील पाचवीपर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदुषणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. नवी दिल्लीतील हवेत धुराचं प्रमाण वाढल्यानं प्रदूषणात विलक्षण वाढ झाली आहे. यामुळे पाचवीपर्यंतच्या वर्गांसोबतच शाळेतील सकाळचे उपक्रमही राबवू नये असे आदेश देण्यात आलेत. दरम्यान हवेतील धुराचं प्रमाण वाढल्यास पुढचे दिवसही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी सांगितलंय.

LATEST VIDEOS

LiveTV