अहमदाबाद : दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेने मोदी-गांधींच्या रोड शोला परवानगी नाही!

11 Dec 2017 12:12 PM

गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणूक सुरु असताना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV