नवी दिल्ली: किरकोळ महागाई दर 4.88 टक्क्यांवर

13 Dec 2017 10:30 AM

ग्राहक मुल्य निर्देशांक म्हणजेच किरकोळ महागाई दरात सलग दुसऱ्यांदा वाढ झाल्याची माहिती, सांख्यिकी विभागाकडून देण्यात आलीय. ऑक्टोबरमध्ये हा दर ३ पुर्णांक ४८ टक्क्यांवर होता. त्यात वाढ होऊन नोव्हेंबरचा दर ४ पुर्णांक ८८ टक्क्यांवर पोहोचलाय. सांख्यिकी विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ३ पुर्णांक ६३ टक्के इतका होता. खाद्यान्य आणि इंधनाचे दर वाढण्याची शक्यता रिझर्व बँकेनं व्यक्त केली होती. त्याचबरोबर तंबाखुजन्य पदार्थ, कपडे आणि गृह उपयोगी वस्तूंच्या दरातही नोव्हेंबरमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV