नवी दिल्ली : लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजनांची नाना पटोलेंना राजीनाम्यावरुन विचारणा

13 Dec 2017 04:09 PM

केंद्र सरकारचे निर्णय़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिलेले भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले यांचा राजीमाना लोकसभा अध्यक्षांनी अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नाना पटोलेंना बोलावून घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजीनामा खरंच द्यायचा आहे का? कधी - कधी रागात असं होऊन जातं, अशा शब्दात महाजनांनी नाना पटोलेंना समजवून सांगण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते.

LATEST VIDEOS

LiveTV