नवी दिल्ली : सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त एकता दौडला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा

31 Oct 2017 11:18 AM

काँग्रेसनं आतापर्यंत नव्या पिढीला सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख करुन दिली नाही. इतिहासाचून त्यांना वगळण्याचे प्रयत्न झाले. एखाद्या राजकीय पक्षाला त्यांचे महात्म्य मान्य असो किंवा नसो, आमची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा विसर इतिहासाला पडू देणार नाही.
अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 142व्या जयंतीनिमित्त आज देशभरात 'रन फॉर युनिटी'चं आयोजन करण्यात आलंय.
राष्ट्रीय एकदा दिवस म्हणून आज साजरा केला जातोय.
दिल्लीत एकता दौडला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना एकतेची शपथही दिली. याप्रसंगी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV