नवी दिल्ली: प्रकाश आमटे दिल्ली दरबारी, अनाथ प्राणी वाचवण्यासाठी साकडं

04 Nov 2017 02:39 PM

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि पत्नी डॉ. मंदाकिनी यांनी केंद्रीय वनमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतलीय. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा-भामरागड भागात आदिवासींची सेवा करतात. इथं डॉ. आमटे दाम्पत्यानं प्राण्यांचंही पितृत्व स्वीकारलंय. परंतु प्राण्यांचे अनाथालय कसं असू शकतं, असा प्रश्न वन अधिकाऱ्यांना पडला आणि प्राण्यांचा सांभाळ बेकायदेशीर आहे. त्यामुळे अनाथालय बंद करा, प्राण्यांना जंगलात सोडा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा दम भरण्यात आला. त्यानंतर आता प्रकाश आमटे यांनी दिल्लीत धाव घेतलीय. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यात मध्यस्ती केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV