गुवाहाटी : जीएसटी परिषदेची आज बैठक, जीएसटी संरचनेत बदल होण्याची शक्यता

10 Nov 2017 12:57 PM

जीएसटी काऊन्सिलची पुढील बैठक शुक्रवारी (10 नोव्हेंबर) गुवाहाटीत होणार आहे. या बैठकीत जीएसटीच्या संरचनेत आणखी बदल अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, रेस्टॉरंटवरील पदार्थांवरील टॅक्सचे दर, 28 टक्के टॅक्स असणाऱ्या काही वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात आणि कंपोजिशन स्कीममध्ये बदल, अशा गोष्टींचा नव्या बदलात समावेशाची शक्यता आहे.

जीएसटीच्या आणि नियमांवर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी जीएसटी काऊन्सिलची आहे. जीएसटी काऊन्सिलचे अध्यक्ष अर्थमंत्री अरुण जेटली आहेत. आतापर्यंत जीएसटी काऊन्सिलच्या 22 बैठका झाल्या आहेत. गुवाहाटीतील बैठक 23 वी असणार आहे.

LiveTV