नवी दिल्ली : काँग्रेसकडून शहजाद पुनावाला यांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

05 Dec 2017 02:15 PM

काँग्रेसमधील घराणेशाही आणि राहुल गांधींवर तुटून पडलेल्या शहजाद पूनावाला यांचे भाजपच्या नेत्यांशी निकटचे संबंध आहेत, आणि त्यामुळेच ते राहुल यांच्यावर टीका करतायत, असा आरोप काँग्रेसनं केला. त्यासाठी शहजाद पूनावाला यांचे भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटोही काँग्रेसनं जारी केले. ज्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, खासदार अमर साबळे, पुण्याच्या कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यासोबत शहजाद छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV