नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता

20 Nov 2017 11:42 AM

तब्बल 19 वर्षांनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं असून, या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी तारीख ठरवण्यासाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची आज सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात निवडणुकीच्या आधीच राहुल गांधी यांच्या खांद्यावर पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल.

काँग्रेसच्या आजच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या तारखेसह, निवडणूक अधिसूचना, उमेदवारांचे अर्ज, अर्ज परत घेण्याची तारीख, मतदान या गोष्टींची घोषणा केली जाईल.

LATEST VIDEOS

LiveTV