अहमदनगर : कोपर्डी निकाल : निर्भयाच्या तीनही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा

29 Nov 2017 08:15 PM

13 जुलै 2016 ला अमानुष अत्याचार करुन निर्भयाची हत्या करणाऱ्या जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. आज सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी कोर्टानं हा फैसला सुनावला. यावेळी निर्भयाची आई, बहीण कोर्टात हजर होत्या. निकाल ऐकताच त्यांना आपले अश्रू अनावर झाले. शिक्षेच्या सुनावणीआधी जितेंद्र शिंदे यानं हात जोडून कोर्टाकडे विनवणी केली. तर संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या चेहऱ्यावरही तणाव होता.
मात्र दोषींनी केलेला विकृतपणा लक्षात घेऊन कोर्टानं अवघ्या 6 मिनिटात निकाल दिला.

LATEST VIDEOS

LiveTV