सातारा : शेतकऱ्याच्या घरात शिरलेला बिबट्या जेरबंद

21 Nov 2017 09:45 AM

सातारा जिल्ह्यातल्या देवळी गावात एका शेतकऱ्याच्या घरात बिबट्या घुसला. शैलेश जाधव यांच्या शेतातील घरात दोन पाळीव कुत्री आहेत. या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या थेट घरात शिरला. सुदैवानं त्यावेळी घरात कोणीही नव्हतं. हा बिबट्या कुत्र्यांवर झडप घालणार तोच शैलेश यानं मोठ्या शिताफिनं घराचा दरवाजा बाहेरुन बंद केला. या बाबतची माहिती महाबळेश्वर वनविभागाला दिल्यानंतर अधिकारी आपल्या टिमसह गावात दाखल झाले. तब्बल साडेतीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं.

LiveTV