ओखीचा तडाखा : समुद्र खवळला, परराज्यातल्या बोटी देवगड, सिंधुदुर्गच्या बंदरात

06 Dec 2017 08:27 AM

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातल्या राज्यांप्रमाणेच गोव्याच्या किनारपट्टीवरही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळाला. सिंधुदुर्गात जवळपास प्रत्येक बंदरावर मासेमारी करणाऱ्या बोटींची गर्दी पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत काही ठिकाणी किनारपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये समुद्राचं पाणी शिरलं. काल रात्रीपासून लाटांचं तांडव सुरू असल्यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र ओखीचा धोका टळल्याचं वृत्त समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान लाटांच्या तडाख्यानं रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV