धुळे : भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : एकनाथ खडसे

31 Oct 2017 11:06 AM

ज्यांनी पक्ष वाढवला, सत्ता आणली असे नेते भाजपबाहेर जातात, मात्र नारायण राणेंसारखे त्यागी नेते भाजपमध्ये येतात, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. धुळ्यात ''आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय'' या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.
खडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले. ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

LATEST VIDEOS

LiveTV