धुळे : गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे आणि अनिल गोटेंना नाव न घेता टोला

26 Dec 2017 06:36 PM

जलसंपदा मंत्री मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे खान्देशातल्या दोन नेत्यांमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात जास्त बोलणाऱ्यांची काय अवस्था होते, हे आपण सर्वच पाहत आहोत असं म्हणत नाव न घेता गिरीश महाजनांनी खडसेंसह भाजप आमदार अनिल गोटेंना टोला लगावला. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा मुलगा डॉ. राहुल भामरेंच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV