धुळे : एसटी महामंडळाच्या नव्या 'शिवशाही' बसवरुन वाद

23 Nov 2017 08:21 PM

एसटी महामंडाळानं थाटामाटात सुरु केलेल्या शिवशाही बसवरुन वादंग सुरु झालंय. खासगीकरणाच्य माध्यमातून सात ठेकेदारांनी शंभर बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. यातील पाच बस धुळ्यातील एका ठेकेदाराच्या आहेत. या सर्व बसवर ठेकेदाराचा चालक असून वाहक महामंडळाचा आहे. ही बस महिनाभरात साडेदहा हजार किलोमीटर फिरली पाहीजे अशी अट घालण्यात आली आहे. या बसच्या भाड्यापोटी महामंडळ ठेकेदराला दर महिन्याला किमान दीडलाख रुपये द्यायचे आहेत. महामंडळाकडं कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी पैसे नसताना शिवशाही बसच्या ठेकेदारांना देण्यासाठी पैसे कोठून आले असा सवाल इंटक संघटनेनं केलाय. तसेच या बसच्या माध्यमातून खासगीकरणाचा डाव असल्याचाही आरोप इंटकने केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV