धुळे : फटाक्यांच्या ट्रकला भीषण आग, चालक-वाहक गंभीर

07 Nov 2017 08:45 PM

धुळ्यात फटाके आणि आगपेटीची वाहतूक करणारा ट्रक आगीत जळून खाक झाला. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या आगीत चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींवर उपचार सुरु आहेत. ट्रक तामिळनाडूकडून उत्तरप्रदेशकडून जात असताना ही दुर्घटना घडली. ट्रक उलटल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र ट्रक नेमका कशामुळे उलटला हे समजू शकलेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV