मुंबई : डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट, कर्मचाऱ्याचा पाय तुटला

20 Nov 2017 01:39 PM

डोंबिवली एमायडीसीतल्या एका कंपनीत आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राजेंद्र जावळे असं या कामगाराचं नाव आहे.

आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज २ मधल्या ऍल्यूफिन कंपनीत स्फोट झाला. कंपनीतल्या कम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात राजेंद्र जावळे गंभीर जखमी झाले होते.  या स्फोटात  त्यांचा पाय तुटला होता.

त्यांच्यावर एमआयडीसीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV