डोंबिवली : राज ठाकरेंचा दोन दिवसीय डोंबिवली दौरा

27 Oct 2017 11:42 AM

मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठेंगा दाखवून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंना जाग आली आहे. इतर शहरांमधील मनसे कार्यकर्त्यांचं मनोबल कायम ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा डोंबिवलीचा दौरा हाती घेतला आहे. राज ठाकरे डोंबिवली जिमखान्यात डोंबिवलीतील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी मनसेच्या 10 नगरसेवकांशीही बातचित करतील. त्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV