EXCLUSIVE : स्वतंत्र नव्या देशाचा दावा करणाऱ्या सुयश दीक्षितशी खास बातचित

15 Nov 2017 06:42 PM

भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून त्याचं ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असं नामकरणही केलं आहे.

इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.

हा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे. फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.

विशेष म्हणजे सुयशने या देशाचा झेंडाही तयार केला. स्वतःच्या वडिलांना त्याने देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV