अहमदनगर : “शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा उपचार घेणार नाही” जखमी शेतकऱ्याचा इशारा

17 Nov 2017 09:15 PM

ऊसदर आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा इथून पुढे उपचार घेणार नाही, असा इशारा उद्धव मापारी यांनी दिला आहे. उद्धव मापारी हे ऊसदर आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या छातीला गोळी लागली आहे.

“बुधवारी ऊस आंदोलनात पोलिसांनी मला गोळ्या घातल्या. माझ्या सहकाऱ्यांवरचे गुन्हे जर प्रशासनाने मागे घेतले नाहीत, तर इथून पुढचा उपचार घेणार नाही. याची सरकारने दखल घ्यावी.”, असे उद्धव मापारी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

LATEST VIDEOS

LiveTV