औरंगाबाद : कर्जमाफीचा अर्ज भरु न शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी : चंद्रकांत पाटील

25 Dec 2017 08:27 PM

जे शेतकरी कर्जमाफिचा अर्ज भरु शकले नव्हते त्यांना पुन्हा कर्जमाफिचा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबादेत भाजपा युवा मोर्चाच्या युवा मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली. तसेच जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून बाजूला काढले गेले असतील, सिस्टीममधून चुकीनं बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी सरकारनं एक कमिटी नेमली असल्याची माहिती चंद्रकांतदादा यांनी यावेळी दिली. दरम्यान, यावेळी चंद्रकांतदादांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आपल्या शैलीत फटकेबाजी केली.

LATEST VIDEOS

LiveTV