रत्नागिरी : हायटेक तेजस एक्स्प्रेसच्या जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा

15 Oct 2017 08:06 PM

हायटेक सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधल्या 15 प्रवाशांना विषबाधा झाल्यानं एकच खळबळ  उडालीय. तेजस एक्स्प्रेसमध्ये दिला जाणारा उपहार खाल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळतेय. प्रवाशांची परिस्थिती बिघडल्यानं तेजस एक्स्प्रेस चिपळुणजवळ थांबवण्यात आली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारी  साडे तीनच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तेजस एक्स्प्रेस चिपळुणजवळच थांबवण्यात आलीय. त्यामुळं गाडीतील इतर प्रवाशांचा देखील चांगलाच खोळंबा झालाय. 

LATEST VIDEOS

LiveTV