गडचिरोली डेपोतील 60 बसमध्ये वायफायची सुविधा

Wednesday, 13 September 2017 10:51 PM

नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आता वायफायची सुविधा असलेल्या एसटी धावणार आहेत. गडचिरोली डेपोत वायफायचे 60 बॉक्स दाखल झाले असून येत्या आठ दिवसांत सगळ्या बसेसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गडचिरोली डेपोत एकूण 107 बसेस आहेत. त्यापैकी 47 बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. उर्वरित 60 बसेसना ही वायफायची सुविधा मिळणार आहे. राज्याच्या एका टोकाला असलेल्या या जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी एसटी एक प्रभावी माध्यम आहे. वायफायच्या मदतीनं ते अधिक उपयुक्त ठरणार आहे. तसंच प्रवाशांची संख्या वाढल्यानं एसटीलाही त्याचा फायदा होणार आहे.

LATEST VIDEO