गडचिरोली : सिरोंचा : कल्लेड चकमकीतील मृत नक्षल्यांची संख्या 8 वर

13 Dec 2017 10:27 AM

गडचिरोलीतल्या सिरोंचा तालुक्यातल्या कल्लेड जंगलात आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे कल्लेड चकमकीत नक्षलवाद्यांच्या मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. 6 डिसेंबरला पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत 5 पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. या चकमकीत आणखी काही नक्षल्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

LiveTV