गुजरात : गीरच्या जंगलात सिंहांना पळवणारे चारपैकी तिघे दुचाकीस्वार अटकेत

10 Nov 2017 03:51 PM

गुजरातमधल्या गीर जंगलातला एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, ज्यात 4 दुचाकीस्वार दोन सिंहांच्या मागे लागले होते आणि त्यांना वेगानं पळवत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा गीर जंगलातला व्हिडिओ पाहिल्यानंतर तात्काळ कारवाई करत त्या चार दुचाकीस्वारांपैकी तीन दुचाकीस्वारांना अटक करण्यात आलं. चौथ्या दुचाकीस्वाराचा शोध सुरु आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओतील गाड्यांच्या नंबरचा आधार घेत तरुणांवर ही कारवाई केली.
गीरचं जंगल हे जगातलं एकमेव ठिकाण आहे जिथं आशियाई सिंहाचं वास्तव्य आढळतं. मात्र आता इथंही सिंहाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं प्राणीमित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV