गोवा : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

30 Dec 2017 08:09 PM

थर्टी फर्स्ट आणि पार्टी गोव्यात नसेल तर नवलंच. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला गोव्यात तुफान पर्यटकांची गर्दी झालीये. पर्यटकांचा ओढा पाहता गोव्यात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलेत.
दरम्यान थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी गोव्यात राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रटीजही दाखल झालेत. पर्यटकांसाठी गोव्यात अनेक ठिकाणी म्युझिकल शोजचंही आयोजन करण्यात आलंय. सध्या गोव्यातील सगळे डिस्को, समुद्रकिनारे गजबजून गेलेत.

LATEST VIDEOS

LiveTV