पणजी(गोवा) : सेन्सॉर सर्टिफिकेट नसल्यानं 'न्यूड' इफ्फीतून वगळला, मनोहर पर्रिकरांचं स्पष्टीकरण

15 Nov 2017 11:27 PMन्यूड चित्रपट अद्याप पूर्ण झाला नसून त्याला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं तो इफ्फी फिल्म फेस्टीवलमधून वगळण्यात आलाय, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय. 20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फी फिल्म फेस्टीवल सुरु होतोय. मात्र या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांपैकी दिग्ददर्शक रवी जाधवांचा न्यूड आणि आणि मल्याळम चित्रपट एस दुर्गा हे दोन चित्रपट सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून अचानक वगळण्यात आले. या निर्णयावरुन सर्वत्र टिकेची झोड उडालीय. तसेच याप्रकरणी इफ्फीचे ज्युरी प्रमुख सुजॉय घोष यांनीही राजीनामा दिलाय. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन न्यूड चित्रपट वगळण्याची कारण स्पष्ट केलं.
तसेच एस दुर्गा हा चित्रपट मुंबई आणि केरळ मधील फ़िल्म फेस्टिव्हल मध्ये नाव बदलून प्रदर्शित करण्यात आल्यानं तो वगळण्यात आल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV