गोवा : ओखी वादळामुळे खवळलेल्या समुद्रात बुडणाऱ्या दोन आयरीश महिलांना वाचवलं

03 Dec 2017 11:18 PM

ओखी वादळाचा फटका आता गोव्यामध्ये बसू लागला आहे. कारण खवळलेल्या समुद्रात बुडताना दोन महिला पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. दक्षिण गोव्यातल्या प्रसिद्ध पाळोळे बीचवर दोन आयरिश महिला समुद्रात उतरल्या होत्या. पण वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळला. आणि समुद्राचे पाणी किनाऱ्याला ओलांडून पुढे आले. त्यामुळे समुद्रात उतरलेल्या दोन्ही महिला खोल समुद्रात जाऊ लागल्या. पण स्थानिकांच्या ही घटना वेळीच लक्षात आल्यानंतर त्या दोन्ही महिलांना वाचवण्यात आलं.  
दरम्यान ओखी वादळामुळे स्विमथॉन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आलेल्या 700 स्पर्धकांची निराशा झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV