गोवा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर सोनिया गांधी व्हेकेशन मूडमध्ये

28 Dec 2017 08:48 PM

काँग्रेसअध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधींच्या खांद्यावर आल्यानंतर सोनिया गांधी काहीशा रिलॅक्स झालेल्य़ा बघायला मिळता आहेत. कारण, गोव्यात त्या सायकलिंग करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. सोनिया गांधी कायमच आपल्या फिटनेस विषयी जागृत असतात. आणि गोव्यात सुटी एन्जॉय करतानासुद्धा त्यांचं फिटनेस प्रेम बघायला मिळतं. सुटीदरम्यान योगसाधना, आणि वाचन करताना त्या विदेशातल्या पाहुण्यांशी चर्चाही करत आहेत. आणि आपल्या चाहत्यांना सेल्फिही देत आहेत. आपल्या निकटवर्तींयांसोबत त्या दक्षिण गोव्यातील 'द लीला' या हॉटेलमध्ये सुटीसाठी आल्या आहेत. २०१८ चं स्वागत त्या गोव्यातच करतील अशीही माहिती मिळत आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV