गोंदिया : जादूटोणाविरोधी कायद्यासाठी सरकारकडून तुटपुंजा निधी, श्याम मानव यांचं वक्तव्य

20 Nov 2017 12:33 PM


मागील सरकारच्या तुलनेत विद्यमान भाजप सरकार जादुटोणा कायद्याच्या प्रसाराकरीता योग्य प्रमाणात निधी उपलब्ध करून देत नसल्याची खंत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी व्यक्त केलीय. ते गोंदियात बोलत होते. विशेष म्हणजे श्याम मानव यांच्या या वक्तव्याला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दुजोरा दिलाय. राज्य सरकारनं 2013 साली जादुटोणा विरोधी कायद्याला मान्यता दिली आहे. या कायद्याच्या प्रचाराची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाची आहे. मात्र या कायद्याच्या प्रचारा साठी तुटपुंजा निधी दिल्याचे बडोलेंनी मान्य केलं..येत्या काळात लवकरच या करीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ असंही बडोले म्हणाले.

LiveTV