मुंबई : म्हाडाच्या 819 घरांची सोडत आज जाहीर

10 Nov 2017 02:33 PM

मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हाडाच्या मुंबई विभागातील 819 घरांसाठी आज (10 नोव्हेंबर) सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातल्या घरांचा समावेश आहे.

विविध विभागातील 819 घरांसाठी 65,126 अर्जदार आज आपलं नशीब आजमावणार आहेत. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात आज सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV